कोरोनावर मात करणाऱ्या दोघांनी जोपासले सामाजिक दायित्व; चार लाखांची दिली देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:45 AM2021-04-28T04:45:11+5:302021-04-28T04:45:11+5:30
अशातच एका नामांकित कंपनीचे राज्याचे वितरक वेल्सन जोसेफ यांनाही कोरोनाने घेरले. त्यांच्यासोबत सत्येंद्रसिंह ठाकूर हेही उपचाराकरिता वाशिम येथील एका ...
अशातच एका नामांकित कंपनीचे राज्याचे वितरक वेल्सन जोसेफ यांनाही कोरोनाने घेरले. त्यांच्यासोबत सत्येंद्रसिंह ठाकूर हेही उपचाराकरिता वाशिम येथील एका खासगी कोविड सेंटरमध्ये भरती झाले होते. या दोघांनीही कोरोनावर मात केल्याने सामाजिक दायित्व म्हणून सामाजिक उपक्रमांसाठी डॉ. बाहेती दाम्पत्यांच्या संस्थेला २७ एप्रिल रोजी चार लाखाची देणगी दिली. तीन लाखाचा एक धनादेश वसुंधरा टेक्निकल संस्थेच्या नावाचा तर एक लाखाचा धनादेश डॉ. हरीश बाहेती यांच्या नावाने भेट म्हणून दिला. वसुंधरा टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. सरोज बाहेती असून या संस्थेच्या माध्यमातून त्या विविध सेवाभावी प्रकल्प राबवित आहेत. ग्राम सावंगा येथे"स्वस्थ सावंगा"हा त्यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू असून कोरोना व लसीकरण जनजागृती अभियानसुद्धा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. हरीश बाहेती यांनी सदर निधीतून एक चांगला प्रकल्प राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. दानशूर बेल्सन जोसेफ यांनी सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला तरुण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष नीलेश सोमाणी उपस्थित होते.