दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:48 PM2019-05-13T17:48:57+5:302019-05-13T17:49:01+5:30

एका महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम घेवून पोबारा करणाऱ्या दोन महिला पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काही वेळातच जेरबंद झाल्या.

Two women arested by police for stolen gold ornaments | दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!

दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : गंगापूर येथून यवतमाळकडे जाणाºया बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम घेवून पोबारा करणाऱ्या दोन महिला पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काही वेळातच जेरबंद झाल्या. हा प्रकार सोमवार, १३ मे रोजी घडला. 
प्राप्त माहितीनुसार, दिपाली किरण आखाडे (रा. डोणगाव, ता.मेहकर, जि.बुलडाणा) ही महिला आपली मुलगी समृद्धी (वय १० वर्षे) आणि अर्पीत (वय दीड वर्षे) यांना घेवून गंगापूर-यवतमाळ बसने प्रवास करित होती. त्याच बसमध्ये पडदे विक्रीचे काम करणाºया दोन महिला बसून होत्या. दरम्यान, दिपाली आखाडे ह्या बसच्या वाहकाकडून तिकीट घेण्यासाठी पर्समधून पैसे काढत असताना पर्समध्येच ठेवून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्या महिलांनी पाळत ठेवली व संधी मिळताच दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केली. मालेगाव येथे दिपाली यांच्यासह चोरट्या महिला देखील बसमधून खाली उतरल्या. काही वेळानंतर पर्समधून दागिने लंपास झाल्याची बाब दिपाली यांच्या लक्षात आली. मात्र, दोन लहान मुले सोबत असल्याने नेमके काय करावे, या विवंचनेत त्या हतबल झाल्या. 
यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिपाली आखाडे व त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही लहान मुलांना पोलिस स्टेशनमध्ये आणून दिलासा दिला. सोबतच दिपाली यांना दुचाकीवर बसवून मालेगावच्या बाजारात चोरट्या महिलांचा शोध घेणे सुरू केले. सुदैवाने दोन्ही चोरट्या महिला एकाठिकाणी बसलेल्या आढळून आल्या. पोलिसी खाक्या दाखविताच दोघींनीही चोरीची कबुली देवून दागिने व पैसे परत केले. दरम्यान, घडलेल्या चोरीच्या घटनेची तत्काळ दखल घेवून पिडित महिलेला न्याय मिळवून देणारे पोलिस कर्मचारी गजानन काळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. याप्रकरणी दिपाली आखाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Web Title: Two women arested by police for stolen gold ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.