दोन महिलांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:18 PM2019-09-23T18:18:04+5:302019-09-23T18:18:09+5:30

सोनाली शरद खेखाडे (१९) रा.हातोली व अर्चना विशाल जाधव (२२) रा.देवठाणा या दोन महिलांनी सोमवारी विष प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Two women consume poison at Manora | दोन महिलांनी केले विष प्राशन

दोन महिलांनी केले विष प्राशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील देवठाणा व हातोली येथील विवाहित महिलांनी २३ सप्टेंबर रोजी विष प्राशन केल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. विष प्राशन करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
प्राप्त माहितीनुसार, सोनाली शरद खेखाडे (१९) रा.हातोली व अर्चना विशाल जाधव (२२) रा.देवठाणा या दोन महिलांनी सोमवारी विष प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला. उपस्थितांनी त्यांना मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दुपारी १ वाजतादरम्यान आणले. ग्रामीण रुग्णालयाच्या चमूने प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने लगेचच त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले. सदर महिलांनी विष कशामुळे प्राशन केले, याची कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Two women consume poison at Manora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.