मंगरूळपिरातील अनधिकृत होर्डिंग हटविले
By संतोष वानखडे | Published: October 10, 2022 05:50 PM2022-10-10T17:50:57+5:302022-10-10T17:51:22+5:30
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारने होर्डिंगबाबत नियमावली बनवली आहे. मात्र, मंगरुळपीर शहरात कोणीही कुठेही बॅनर, झेंडे व पताका लावतात.
मंगरूळपीर शहरात जागोजागी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत होर्डिंगबाबत ‘लोकमत’ने १० ऑक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित करताच, याची दखल घेत नगर परिषद व पोलीस विभागाने सोमवारी (दि.१०) अनधिकृत होर्डिंग हटविले.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारने होर्डिंगबाबत नियमावली बनवली आहे. मात्र, मंगरुळपीर शहरात कोणीही कुठेही बॅनर, झेंडे व पताका लावतात. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून मंगरुळपिर नगर परिषदने कारवाई करावी असे पत्र मंगरुळपिर पोलिसांनी नगर परिषदला दिले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले. याची दखल घेत सोमवारी नगर परिषद व पोलीस विभागाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत बॅनर व विविध फलक काढण्यात आले.