रस्त्यावर शेतमालाची अनधिकृत खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:05 AM2017-11-11T01:05:13+5:302017-11-11T01:06:12+5:30

वाशिम : कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि परवानाधारक खासगी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी शेतमाल खरेदीची मुभा नसतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या नियमाचे उल्लंघन करून रस्त्यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. ‘लोकमत’ने १0 नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झाली.

Unauthorized purchase of farm land! | रस्त्यावर शेतमालाची अनधिकृत खरेदी!

रस्त्यावर शेतमालाची अनधिकृत खरेदी!

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांकडून अल्प भावात खरेदीस्टिंग ऑपरेशन

शिखरचंद बागरेचा । 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि परवानाधारक खासगी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी शेतमाल खरेदीची मुभा नसतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या नियमाचे उल्लंघन करून रस्त्यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. ‘लोकमत’ने १0 नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झाली असून, या प्रकारातून शासनाच्या कराची बुडवणूक होत आहेच शिवाय अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांकडून बेभाव शेतमाल खरेदी करून त्यांचीही लूट करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. 
शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी पणन संचालनालयाच्या अखत्यारित बाजार समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. एखाद्या तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असेल, तर त्या तालुक्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक उपबाजारांचीही स्थापना करण्यात आली आहे. याच बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या शेतमालाची लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी व्यापारी, अडत्यांना अधिकृत परवानेही देण्यात येतात. त्याशिवाय काही व्यापारी मिळून खासगी बाजार समित्यांचीही स्थापना करतात आणि त्याला शासनाची परवानगीही असते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सन २00६ मध्ये सुधारणा करुन त्यामध्ये खासगी बाजार, थेट पणन, शेतकरी ग्राहक बाजार व कंत्राटी शेती, इ. पर्याय उपलब्ध करुन शेतकर्‍याला आपला कृषी माल विकण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. या अंतर्गत राज्यामध्ये खासगी बाजार व थेट पणन यांचे मोठय़ा प्रमाणात परवाने देण्यात आले आहेत. अशा अधिकृत स्थळांवर लिलाव पद्धतीने शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करण्यात येतो. शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावेत, यासाठी ही संकल्पना अस्तित्वात आली असून, या बाजार समित्यांमध्ये व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या शेतमालावर बाजार समित्यांकडून शेस अर्थात कर वसुलीही केली जाते. या कर वसुलीतील पाच टक्के रक्कम शासनाला मिळते. अर्थात ही व्यवस्था शेतकर्‍यांच्या फायद्यासह शासनाच्या महसुलात भर टाकणारी आहे; परंतु काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे शेतमाल खरेदीचा प्रकार करण्यात येत आहे. अडीअडचणीच्यावेळी शेतमालाची रक्कम तत्काळ मिळावी म्हणून शेतकरी अशा ठिकाणचा आधार घेतात. त्याचा फायदा घेऊन शेतकर्‍यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकमतच्यावतीने शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये प्रत्येक तालुक्यात वर्दळीच्या रस्त्यावरच छोटीमोठी दुकाने थाटून अनधिकृतपणे शेतमालाची बेभाव खरेदी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे शेतकर्‍यांची लूट होत आहेच शिवाय बाजार समित्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत असताना बाजार समित्यांकडून त्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

 वाशिम शहरांतर्गत नियमबाह्य खरेदी करणार्‍यांवर वेळोवेळी दंडाची कारवाई करण्यात येते. बाजार समितीच्या बाहेर खरेदी करण्याची कुठलीही परवानगी नाही. त्यामुळे अशा खरेदीदारांची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 
- बबन इंगळे 
सचिव 
बाजार समिती वाशिम 
शेतमाल खरेदी नियम 

कारंजा तालुक्यात रस्त्यावर दुकान थाटून शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. यानंतरही कोणी नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याची पाहणी करून त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल. 
-नीलेश भाकरे 
सचिव 
बाजार समिती कारंजा 
-
 

Web Title: Unauthorized purchase of farm land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती