बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:51 AM2017-07-18T00:51:52+5:302017-07-18T00:51:52+5:30

शिरपूर पोलिसांची मोहीम: ३४ वाहनधारकांकडून दंड वसूल

Unconscious dealers take action! | बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा!

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: पोलीस स्टेशन शिरपूच्यावतीने मोटार वाहन कायद्यान्वये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेंतर्गत विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कागदपत्रे सोबत न बाळगता वाहन चालविणे, नो पार्किगचे उल्लंघन, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशा एकूण ३४ वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३ हजार १०० रुपयांचा वसुल करण्यात आला आहे.
शिरपूर पोलिसांनी १७ जुलै रोजी जिल्हयात घडलेल्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पो. अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन वाहन तपासणी मोहीम राबविली. विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कागदपत्रे सोबत न बाळगता वाहन चालविणे, नो पार्किगचे उल्लंघन, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी ही मोहीम राबविण्यात आली होती.
यामध्ये स्थानिक रिसोड फाटा परिसरात चोरीच्या घडलेल्या घटनावरून शिरपूर पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम राबविताना ३१ दुचाकी स्वाराजवळ लायसन्स कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई केली. त्यशिवाय पोलिसांच्यावतीने चार चारचाकी वाहनावरही कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पो.नि. हरिष गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंदारे, पोलीस उपनिरीक्षक गिरीष तोगडवाल यांच्या उपस्थितीत पोलिस कर्मचारी माणिक खानझोडे, संतोष विठोळे, नागरे, पाईकराव, रामेश्वर जोगदंड, सह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Unconscious dealers take action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.