रोजगार हमी योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील विहिरींच्या देयकाचा तिढा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:36 PM2017-12-17T18:36:31+5:302017-12-17T18:37:20+5:30
कारंजा लाड - रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील २० ते २५ विहिरी मंजूर असून, या विहिरींच्या देयकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहीरीचे काम मजुरांऐवजी मशिनने करायचे असल्यास संबंधितांकडून पैशाची मागणी होत असल्याची आपबिती काजळेश्वर येथील ग्रामपंचायत माजी सदस्य मो. जमील मो. अफजल व अन्य लाभार्थींनी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिका-यांकडे मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

निवेदनानुसार, काजळेश्वर येथील रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकरी लाभार्थींना सिंचन विहिरी मंजुर झाल्या आहेत. परंतू लाभार्थ्यांनी मजुराव्दारे विहिरी न खोदता ठेका पध्दतीने विहिरी खोदण्याकरीता दिल्या आहे. संबंधित ठेकदार हा मजुरी पध्दतीने न करता मशिनद्वारे विहिरींची कामे करीत असून, खोटे मस्टर भरले जात असल्याचा आरोप लाभार्थींनी निवेदनाद्वारे केला. मशिनने विहिरी खोदलेल्या असताना विहिरीचे खोदकाम मजुरामार्फत केल्याचे दाखवून देयक काढत असल्याचा प्रकार निवेदनाद्वारे शेतकरी लाभार्थींनी समोर आणला आहे. काही शेतकरी स्वत: विहिरीचे खोदकाम करण्यास तयार आहे. या शेतकºयांना देयक काढून देण्याच्या नावाखाली पैशाची केली जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
जवळपास १५ ते २० हजार रूपयांची पुर्तता न केल्यास मजुरांची मागणी न घेणे, मस्टर न टाकणे, चालु विहीरीचे काम बंद करायला लावणे अशा प्रकारे अडथळा निर्माण करून शेतकºयांना मानसिक व आर्थिक त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी लाभार्थींनी केला आहे. काजळेश्वर येथील रोहयो अंतर्गत खोदकाम करण्यात आलेल्या विहिरींची चैकशी करून दोषी आढळणाºयाविरूद्ध कारवाई करावी तसेच विनाविलंब अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मो.जमील मो.अफजल व ईतर लाभार्थी शेतक-यांनी केली आहे. या निवेदनावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.