दिग्रस ते कल्याण बससेवा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:23 PM2017-09-08T20:23:42+5:302017-09-08T20:23:52+5:30
२०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री तथाशिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांचेकडे केली. तसेच दिग्रस कल्याण एस.टी. ला पोहरागड एक्सप्रेस नाव देण्याचीही मागणी यावेही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: २०१५ पासून सुरु असलेली दिग्रस ते कल्याण बससेवा गत सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आली. पोहरागड येथे भाविकांची गर्दी पाहता ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम विजय नाईक जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री तथाशिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांचेकडे केली. तसेच दिग्रस कल्याण एस.टी. ला पोहरागड एक्सप्रेस नाव देण्याचीही मागणी यावेही करण्यात आली.
बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा जि.वाशिम हे जगप्रसिध्द तिर्थक्षेत्र असुन संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी सामकीमाता यांचे समाधीस्थळ असून या काशीत वर्षभर भाविक भक्तांची वर्दळ असते. रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत भारत भरातील भाविक समाधीस्थळी माथा टेकण्यासाठी या पावन भुमीत येतात. या काशीत राज्यभरातील भाविकांना आंधप्रदेश, कर्नाटक या राज्याची एस.टी. महामंडळाची बस चालु असुन महाराष्ट्र एस.टी. महामंडळाची दिग्रस ते कल्याण ही बस सेवा २०१५ पासून सुरु होती.परंतु मागील सहा महिन्यापासून ही बस सेवा अचानकपणे बंद केली असुन ही बस पुर्ववत सुरु करुन या बसचा दिशा भूमीच्या धर्तीवर पोहरागड एक्सप्रेस नामकरण करुन ती बस पुर्ववत सुरु करुन भाविकाची होणारी परवड थांबवुन न्याय द्यावा. एस.टी.महामंडळ कडुन रोज रोज नवनवीन व वाताणुकुलीत बस तयार करुन सुखाचा प्रवास एस.टी. चा प्रवास हे ब्रिद घेवुन गाव तिथे एस.टी. बस पोहचविण्याचा संकल्प महामंडळ करीत असतांना मुंबई, पुणे, औरंगाबाद सह मुंबई परिसरातील गोरगरीब जनतेला सुलभ प्रवास देणारी कल्याण येथुन सकाळी ७ वाजता निघणारी बस दिग्रस येथे पोहरादेवी वरुन दिग्रस येथे रात्री ११ वाजता तर द्रिगस येथुन सकाळी ७ वाजता निघुन कल्याण मुंबई येथे रात्री ११ वाजता पोहोचणारी बस अचानकपणे बंद झाल्याने भाविकांच्या सेवेत पुर्ववत सुरु करुन या बस सेवेचा पोहरागड एक्सप्रेस नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ.शाम जाधव, माजी शहर प्रमुख मनोहर राठोड , े शिवसैनिक प्रा.ओम बलोदे , सर्कल प्रमुख नंदु चौधरी पाटील, सुनिल जाधव, संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.