‘मुलांना समजून घेताना’ : प्रदिप अवचार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:04 PM2019-07-13T15:04:25+5:302019-07-13T15:04:48+5:30

वाशिम  : पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन करुन मुलांना कसे समजून घेतल्या जावू शकते यावर डॉ. प्रदिप अवचार ...

Understanding Children: guidance to students | ‘मुलांना समजून घेताना’ : प्रदिप अवचार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘मुलांना समजून घेताना’ : प्रदिप अवचार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

googlenewsNext

वाशिम  : पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन करुन मुलांना कसे समजून घेतल्या जावू शकते यावर डॉ. प्रदिप अवचार यांनी एक आगळा-वेगळा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामधून मुलांसोबतची वागणूक, त्यांचे प्रश्न कसे सोडवावेत याबाबत पालकांना मोलाचे सहकार्य मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यक्रमाचे नावचं ‘मुलांना समजून घेतांना’ असे आहे. पालकांची उपस्थिती त्यांच्या कार्यक्रमाचे फलीत आहे.
अकोला येथील सुप्रसिद्ध बाल समुपदेशक डॉ. प्रदिप अवचार हे लहान मुलांवर कश्या पध्दतीने संस्कार असावेत यात पालकांची काय भूमिका असायला पाहिजे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. मुलांचा हट्ट त्यांना नाराज न करता कसा पूर्ण केला जावू शकतो यासह मुलांबाबत उदभवणाºया सर्व समस्यांवर ते मार्गदर्शन आपल्या कार्यशाळेतून करताहेत. विशेष म्हणजे कोणत्या मुलाला कोणत्या विषयात, कशात रुची आहे याचीही ती चाचपणी करुन आपल्या पालकांना माहिती देतात. प्रत्येक पालकाला आपला पाल्य डॉक्टर व्हावा, इंजिनिअर व्हावा किंवा अधिक काही व्हावा असे वाटते, परंतु मुलाला काय हवे, त्याचा इंटरेस्ट कशात आहे याचा विचार पालक करतांना दिसून येत नाहीत. त्याच्यामध्ये असलेले गुण, कल्पकतेचा विचार करुन त्याला शिक्षण दिल्यास त्यामध्ये त्याबाबतीत आवड निर्माण होवून तो त्याला पाहिजे त्यामध्ये करिअर निर्माण करु शकतो. त्याकरिता पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन केल्या जात आहे. वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर येथील स्व. मोतीरामजी गंगारामजी इंगोले फाउंडेशन द्वारा संचालित इंडियाज  फाउंडेशन स्कूलमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे विशेषता पालकांनी चांगले कौतूक केले आहे. यावेळी त्यांनी पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन व त्यांना उपाय सांगून त्यांच्या प्रश्नांचे निरासरण केले. यावेळी पालकही आपल्या पाल्यांनासमोर ठेवून प्रश्न विचारले त्याचे निरासरन डॉ. अवचार यांनी पालकांना समजेल अशा सोप्या सरळ भाषेत त्यांना समजावून सांगितले.

Web Title: Understanding Children: guidance to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.