उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:43+5:302021-04-20T04:42:43+5:30
येथिल ग्रामपंचायतने चौदाव्या वित्त आयोगाच्या विकास निधी अंतर्गत गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यासह,पेवर ब्लाॅक रस्त्याच्या माध्यमातून गावातील गल्ली बोळातील रस्ते ...
येथिल ग्रामपंचायतने चौदाव्या वित्त आयोगाच्या विकास निधी अंतर्गत गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यासह,पेवर ब्लाॅक रस्त्याच्या माध्यमातून गावातील गल्ली बोळातील रस्ते चकाचक केले आहेत. वाशीम जिल्हा परिषेदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील जवळपास अकराशे कुटुंबांशी संवाद साधत स्वच्छता अभियाची जनजागृती केली. या जनजागृतीच्या माध्यमातून सुमारे ८० टक्के वैयक्तिक शौचालयाची बांधणी केली. ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय बांधणीकरिता जागा उपलब्ध नाही, अशा कुटुंबांसाठी साडेसात लाखांच्या निधीतून चार शौचालय युनिटची बांधणी केली आहे. यातील दोन पुरुषांकरिता तर दोन महिला करीता स्वतंत्र युनिटची व्यवस्था करीत स्वच्छता अभियानाला प्राधान्य दिले आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीमधील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
००००
गावातील उघड्यावर शौचास बसण्यावर विविध प्रकारे निर्बंध लादले असून ग्रामस्थांसाठी वैयक्तिक शौचालयाबरोबर चार सार्वजनिक शौचालय युनिट बांधण्यात आले आहे. उघड्यावर शौचास जाण्यावर निश्चित आळा बसणार आहे.
पी.के.चोपडे,
सरपंच ग्रा.पं. भर जहागीर