मेडशीत २२ जणांचा वीज पुरवठा पुर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:48+5:302021-03-13T05:16:48+5:30
गत काही वर्षांपासून दरवर्षी दुष्काळसदृष स्थिती निर्माण होत आहे. यामुळे गतवर्षी रब्बीचे पीक हातून गेले. तसेच खरीपातही सोयाबीनच्या उत्पन्नात ...
गत काही वर्षांपासून दरवर्षी दुष्काळसदृष स्थिती निर्माण होत आहे. यामुळे गतवर्षी रब्बीचे पीक हातून गेले. तसेच खरीपातही सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. अशातच महावितरणने थकबाकी वाढल्याचा मुद्दा समोर करून गेल्या दोन दिवसांपासून कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करणे सुरू केले आहे. याअंतर्गत परिसरातील ५० शेतकºयांची वीज तोडण्यात आली. दरम्यान, १२ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांनी महावितरणच्या अधिकाºयांसोबत चर्चा करून तथा शेतकºयांकडून काही प्रमाणात वीज देयकांची रक्कम भरून घेण्यात मोलाची भुमिका बजावली. त्यानंतर २२ शेतकºयांचा वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुलचंद चव्हाण, गजानन साठे, अमोल तायडे, जगदीश राठोड, प्रशांत घुगे यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती.