लोहगाव येथील पाणी पुरवठा योजना पूर्ववत

By admin | Published: May 31, 2017 01:46 PM2017-05-31T13:46:11+5:302017-05-31T13:46:11+5:30

पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने देयक भरल्यानंतर सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Undo water supply scheme at Lohgaon | लोहगाव येथील पाणी पुरवठा योजना पूर्ववत

लोहगाव येथील पाणी पुरवठा योजना पूर्ववत

Next

लोहगाव-महागाव : थकीत देयकाअभावी बंद असलेली पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने देयक भरल्यानंतर सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील ग्रामपंचायतकडे नळयोजनेचे देयक थकल्याने विद्युत वितरण कंपनीेने वीज पुरवठा खंडित केला होता. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठभ् वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. ग्रामपंचायतने वितरण कंपनीशी चर्चा करुन व त्यावर तोडगा काढून काही बिल अदा केल्याने सद्यस्थितीत पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. ग्रामपंचयात कडे जवळपास ६० हजार रुपये विज वितरण कंपनीचे थकीत आहेत.  उर्वरित बील लवकर अदा न केल्यास पुन्हा ही परिस्थिती ओढावण्याची शक्यता ग्रामस्थांमध्ये वर्तविल्या जात आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतिने ग्रामस्थांकडे असलेली थकीत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज बिल भरणा न झाल्यास पुन्हा कधीही नळयोजना बंद पडू शकते तरी ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेच्या लाभधारकांनी त्यांच्याकडे असलेले थकीत देयक तातडीने ग्रामपचयातकडे भरणा करावा व पुन्हा असा प्रसंग टाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत सचिवांनी केले आहे.

Web Title: Undo water supply scheme at Lohgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.