पाणी बचतीचा सामाजिक संस्थेच्यावतिने आगळा-वेगळा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 07:56 PM2017-10-03T19:56:39+5:302017-10-03T19:57:12+5:30

वाशिम : चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे   भविष्यातील  पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता  त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील  राजरत्न संस्थेमार्फत  जिल्हाभरात पाणी बचतीचा संदेश देत पत्रके वाटुन  पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी लोकआग्रह करीत आहेत.

A unique message by the Water Savings Society | पाणी बचतीचा सामाजिक संस्थेच्यावतिने आगळा-वेगळा संदेश

पाणी बचतीचा सामाजिक संस्थेच्यावतिने आगळा-वेगळा संदेश

Next
ठळक मुद्देराजरत्न संस्थेचा उपक्रम घरोघरी वाटल्या जाताहेत पत्रके!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे   भविष्यातील  पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता  त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील  राजरत्न संस्थेमार्फत  जिल्हाभरात पाणी बचतीचा संदेश देत पत्रके वाटुन  पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी लोकआग्रह करीत आहेत.
दसरा या सणानिमित्त गाड्या धुण्याकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केल्या जाते. पाण्याचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता   संस्थेच्यावतीने गाड्या धुण्याऐवजी त्या पुसून घ्याव्यात, कुठल्याही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत यंत्रणेस संचित करावे, नेहमी पाणी काटकसरीने वापरावे, लागेल तेवढेच पाणी घ्यावेत, पाण्यासाठी भांडणतंटे होवु देवु नयेत, धुण्या भांड्याचे पाणी झाडांना टाकावे,  भर पावसाळ्यात जिल्हाभरात तीव्र पाणी टंचाई सदृश चित्र उभे असुन वेळीच सजग होवुन पाण्याची बचत केल्यास पाणी टंचाईवर थोड्यातरी प्रमाणात काय होईना मात करणे शक्य होईल. असा संदेश पत्रकाच्या माध्यमातून संस्थेचे प्रतिनिधी शहर तसेच ग्रामीण भागात जावुन देत आहेत. पाणी हे नैसर्गीक देण आहे,  पाणी हेच जीवन आहे. त्याला मोठ्या प्रमाणात कृत्रीम पध्दतीने बनविता येत नसल्यामुळे  पाण्याचे महत्व संस्थेचे प्रतिनिधी पटवुन देत आहेत. जिल्ह्यातील सर्व सूज्ञ नागरिकांनी या बाबीचा थोडातरी विचार करुन पाणी बचत करावी असे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, भगवान ढोले, अरविंद उचित, सत्येंद्र भगत,  अविनाश नाईक, प्रशांत राठोड, विकास पट्टेबहादूर, हंसीनी उचित आदिचे वतीने करण्यात येत आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात काय होईना मात करणे शक्य होईल. प्रशासनाला सहकार्य करण्याकरिता पाणी बचत करणे काळाची गरज असून या संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे उन्हाळयापूर्वीच भीषण पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून संस्थेची सभा घेवून याबाबत जनजागृती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता घरोघरी जावून पाणी बचतीबाबत जनजागृती करतांना नागरिकांकडून मिळत असलेले सहकार्य व उपक्रमाची स्तुती होत आहे.
- भगवान ढोले, सदस्य, राजरत्न संस्था

Web Title: A unique message by the Water Savings Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.