विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न थंड बस्त्यात!

By admin | Published: July 11, 2017 01:52 AM2017-07-11T01:52:24+5:302017-07-11T01:52:24+5:30

रिपाइंचे निवेदन : आंदोलनाचा इशारा

University sub-center questions in the cold storage! | विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न थंड बस्त्यात!

विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न थंड बस्त्यात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिममध्ये व्हावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे शासनाकडे केली.
वाशिमला उपकेंद्र होणे ही फार जुनी मागणी असून, अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमध्येही उपकेंद्राचा ठराव मंजूर झाला आहे. अनसिंग रोडवरील बाभूळगाव शिवारात १०८ एकर जमिनही विद्यापीठाच्या उपकेंद्र मंजुरातीकरिता प्रस्तावित आहे. वाशिम उपकेंद्राबाबत अमरावती विद्यापीठातील शिक्षण संचालक यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मुंबई यांना वाशिम उपकेंद्र स्थापनेबाबत २६ सप्टेंबर २०१२, शासन बैठक १० जानेवारी २०१३ रोजी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन हा प्रस्ताव मंजूर होणेकरिता आवश्यक ती माहिती सादर करुन पाठपुरावा केला आहे. २८ मे २०१३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली होती. या सभेला विद्यापीठाचे कुलगुरु व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या सगळ्या प्रक्रिया व माहितीचा पाठपुरावा केल्यानंतरही व सर्व बाबी व्यवस्थित असताना शासन स्तरावर प्रस्ताव धूळ खात आहे. विद्यापीठ उपकेंद्रासाठी लोकचळवळ निर्माण करुन आंदोलन उभारण्याचा इशारा तेजराव वानखेडे यांनी दिला.

Web Title: University sub-center questions in the cold storage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.