सोयाबीनवर अज्ञात रोग : पावसाअभावी सुकताहेत पिक, शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:14 PM2018-09-11T13:14:47+5:302018-09-11T13:15:45+5:30

वाशिम : कुठे पावसाची प्रतिक्षा तर कुठे पिकांवर आलेला अज्ञात रोगामुळे सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.

Unknown disease on soybeans: drying up due to lack of rains, farmers worry | सोयाबीनवर अज्ञात रोग : पावसाअभावी सुकताहेत पिक, शेतकरी चिंतेत

सोयाबीनवर अज्ञात रोग : पावसाअभावी सुकताहेत पिक, शेतकरी चिंतेत

Next
ठळक मुद्देजिल्हयात काही भागात गत १५ दिवसांपासून पाणीच न आल्याने सोयाबीन पीक करपून जात आहे. शेतातील पिक पावसाअभावी पिवळे पडल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षा करतांना दिसून येत आहे.   अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कुठे पावसाची प्रतिक्षा तर कुठे पिकांवर आलेला अज्ञात रोगामुळे सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.
जिल्हयात काही भागात गत १५ दिवसांपासून पाणीच न आल्याने सोयाबीन पीक करपून जात आहे. रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारामधील शेतातील पिक पावसाअभावी पिवळे पडल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षा करतांना दिसून येत आहे.  वाशिम तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीन पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. याबाबत मात्र काही ठिकाणी कृषी विभागाचे मार्गदर्शनाची गरज असतांना ते होतांना दिसून येत नाही. हातचे पीक जाते की काय अशी भीती शेतकºयांमध्ये दिसून येत आहे. 
वाशिम तालुक्यातील देपूळ येथील शेतकरी महादेव डिगांबर गंगावणे यांच्या शेतातील दोन एकरातील सोयाबीन पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने पीक नष्ट झाले. आपल्या शेतात या अज्ञान रोग येवू नये यासाठी परिसरातील शेतकरी उपाय योजना करतांना दिसून येत आहे. या रोगाने सोयाबीनची पाने पिवळी पडली असून फूल, शेंगा करपून गेल्या आहेत. विशेष म्हणजे या अज्ञात रोगाने झाडेही सुकून जात आहेत. याबाबत सदर शेतकºयाने कृषी विभागालाही कल्पना दिली परंतु याची काळजी घेण्यात आली नाही. यासंदर्भात त्यांनी महसूल व कृषी विभागाला निवेदनही दिले. तसेच रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक करपून जात आहे. पाणी असलेले शेतकरी ते वाचविण्याचा प्रयतन करीत आहेत परंतु ज्यांच्याकडे सोय नाही त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. 

कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी
वाशिम तालुक्यातील देपूळ परिसरात पीकांवर पडलेल्या अज्ञात रोगाने संपूर्ण सोयाबीन पिक नष्ट झाले. याची पाहणी करुन  ईतर शेतकºयांचे नुकसान होवू नये याकरिता उपाय योजना करण्याची मागणी या परिसरातील शेतकºयांतून केली जात आहे.

Web Title: Unknown disease on soybeans: drying up due to lack of rains, farmers worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.