बॅंक बंदमुळे ग्राहकांना नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:20+5:302021-07-11T04:27:20+5:30

मानोरा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या नियमित व्यवहाराला खातेदारांसह नागरिक कमालीचे कंटाळले असून डिपाॅझिट व विड्रॉलसाठी दिवसभर केवळ एकच काउंटर ...

Unnecessary inconvenience to customers due to bank closure | बॅंक बंदमुळे ग्राहकांना नाहक त्रास

बॅंक बंदमुळे ग्राहकांना नाहक त्रास

Next

मानोरा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या नियमित व्यवहाराला खातेदारांसह नागरिक कमालीचे कंटाळले असून डिपाॅझिट व विड्रॉलसाठी दिवसभर केवळ एकच काउंटर राहत असल्यामुळे नागरिकांना सर्व कामे सोडून दिवसभर बसावे लागते. शिवाय एटीएम कायमचे बंद असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागतो, परंतु शक्रवारी स्टेट बँकेने प्रमुख गेट बंद ठेवून बॅंकेचे व्यवहार दिवसभर बंदच राहिले. बॅंकेचे व्यवहार चालू होतील या आशेने शेकडो नागरिक बॅंकेच्या प्रवेशद्वारासमोर ताटकळत उभे दिसून आले. बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी ग्रामीण नागरिक आपली कामे साेडून व्यवहारासाठी बॅंकेत येतात. परंतु बॅंकेच्या आडमूठे धोरणामुळे अकारण त्रास सहन करावा लागत आहे . बॅंकेचे व्यवहार सुरळीत व पारदर्शक करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहे .

-----------

एटीएम नावालाच

खातेदारांची पैसे काढण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास पैसे मिळावे यासाठी एटीएमची स्थापना करण्यात आली . परंतु येथील एटीएम शोभेची वस्तू बनली आहे . शेकडाे ग्राहक दरराेज एटीएममध्ये जाऊन खाली हात परत असल्याने ग्राहकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.

Web Title: Unnecessary inconvenience to customers due to bank closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.