नाली बांधकामाच्या आश्वासनानंतर उपाेषण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:36 AM2021-01-21T04:36:45+5:302021-01-21T04:36:45+5:30
शहरातील देशपांडे प्लॉटमध्ये सिमेंटचा रस्ता आणि बाजूला नालीचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने अर्धवट नाली करून ...
शहरातील देशपांडे प्लॉटमध्ये सिमेंटचा रस्ता आणि बाजूला नालीचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने अर्धवट नाली करून सय्यद आयूब यांच्या घरासमोर नाली आणून बांधकाम सोडून दिले. यामुळे नालीतील पाणी आयूब यांच्या घरासमोर साचून घाण पसरली होती. या विराेधात त्यांनी नगर पंचायतविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. यानुसार ते उपोषणाला बसले होते. मात्र, नगर पंचायत प्रशासनाने मध्यस्ती करून हे प्रकरण सोडविले. ऑफलाइन टेंडर काढून समोर नाली करण्यात येईल आणि हे बांधकाम एका आठवड्यात सुरू करून ते पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी नगरसेवक बबनराव चोपडे, अरुण बळी, जगदीश बळी, पंजाबराव घुगे, रामदास काटकर यांनी मध्यस्ती करून उपोषण सोडले. अय्युब सर यांच्या सोबत पप्पू कुटे, किशोर शिंदे, सय्यद याकूब, आझाद खान, जाबीर पठाण, शेख निसार, शेख साबीर, अजहर सय्यद, शेख जफर, रहमो शाह, गफ्फार शाह, रामदास सावले, सय्यद खाजा, अभी घुगे, सय्यद इमरान वकील, जावेद खान, कदीर भाई, दाऊद भाई, सय्यद दिलावर, शेख शरीफ मुन्ना, सय्यद निजाम भाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.