पोर्टलवर मृत्यूची आकडेवारी ‘अपडेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:25+5:302021-06-06T04:30:25+5:30
.................... तरुणांना लस मिळण्याची प्रतीक्षा वाशिम : १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील तरुण व इतर व्यक्तींचा लसीकरणासाठी विचार झालेला ...
....................
तरुणांना लस मिळण्याची प्रतीक्षा
वाशिम : १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील तरुण व इतर व्यक्तींचा लसीकरणासाठी विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यात धास्ती निर्माण झाली असून, लस मिळण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
..............
मान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यात
वाशिम : महावितरण आणि नगरपालिकेने हाती घेतलेली मान्सूनपूर्व कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. या अंतर्गत नालीसफाई, झाडांच्या अनावश्यक फांद्या तोडण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
.................
खासगी शाळांची विद्यार्थी टिकविण्याची धडपड
वाशिम : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे, अशा स्थिती खासगी शाळांनी विद्यार्थी टिकविण्यासाठी धडपड चालविली आहे.
...............
चाैकाचाैकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
वाशिम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियम लावून दिले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. त्यानुषंगाने चाैकाचाैकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
...............
औषध विक्रेत्यांचा प्रश्न ‘जैसे थे’
वाशिम : कोरोना काळात सर्वत्र बंद असताना, औषध विक्रेत्यांनी दुकाने सुरू ठेऊन सेवा दिली. असे असताना त्यांचा व त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचा लसीकरणात विचार झालेला नाही. याबाबत आंदोलन करूनही हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे.
...............
वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. अशात प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या काहीच फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, खासगी वाहतूक अद्याप बंदच असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
.................
स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी
वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाची पदे रिक्त असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. यामुळे गैरसोय होत असून, सुविधांयुक्त स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
.............
खाद्यान्न सुरक्षा जनजागृतीस ‘खो’
वाशिम : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. प्रशासकीय पातळीवरून यासंबंधी कुठलीच जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकही दरमहा होत नसल्याचे दिसत आहे.
......................
गुरांच्या चराईचा प्रश्न बिकट
वाशिम : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती. मात्र, वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे गुरांच्या चराईचा प्रश्न बिकट झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
...............
एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त
वाशिम : शहरातील पाटणी चाैकात विविध बॅंकांचे एटीएम आहेत. मात्र, त्यातील अनेक एटीएम बंद राहत असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर बाबीकडे बँकांनी लक्ष पुरवून ग्राहकांची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.
......................
ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाउन
वाशिम : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने, गावपातळीवरील कामांचा खोळंबा होत आहे. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देशित करण्याची मागणी गौतम गायकवाड यांनी जिल्हा परिषदेकडे केली.