वाशिम जिल्ह्यात वृध्द कलावंतांच्या बँक खात्याचे अद्ययावतीकरण रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:24 PM2017-12-01T14:24:50+5:302017-12-01T14:28:36+5:30
वाशिम: राज्यातील मान्यवर साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत मंजूर कलावंतांच्या मानधनाची रक्कम गेल्या वर्षीपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ झाला आहे.
वाशिम: राज्यातील मान्यवर साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत मंजूर कलावंतांच्या मानधनाची रक्कम गेल्या वर्षीपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. यासाठी त्यांच्या खात्याचे अद्ययावतीकरणही करण्यात येत आहे; परंतु वाशिम जिल्ह्यात अद्याप निम्म्या कलावतांच्या खात्याचे अद्ययावतीकरण माहितीअभावी रखडले आहे. त्यामुळे संबंधित कलावंतांना मानधनाची रक्कम मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर संबंधित कलावंतांनी आपली संपूर्ण माहिती सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण अधिकाºयांनी केले आहे. राज्यातील मान्यवर साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत मंजूर कलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत दरमहा १५०० रुपये मानधन देण्यात येते. त्यांना देण्यात येणाºया मानधनाच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता असावी म्हणून, शासनाने मानधनाची रक्कम थेट कलावंतांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंजूर कलावंतांच्या बँक खात्याची अद्ययावत माहिती सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्राप्त करण्यात येत आहे; परंतु अद्यापही शेकडो कलावंतांनी ही माहिती सादर केली नाही. त्यामुळे कलावंतांच्या बँक खात्यांचे अद्ययावतीकरण रखडले असून, त्यांच्या खात्यात मानधनाची रक्कमही जमा करणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर अद्यापही आपल्या बँक खात्याची माहिती सादर न केलेल्या कलावंतांनी आपली माहिती तातडीने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात सादर करावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. या प्रक्रि येसाठी कलावंतानी बँक खाते पुस्तकाची स्पष्ट झेरॉक्स प्रत, ज्यामध्ये खाते क्रमांक,अद्ययावत व सूस्पष्ट दिसणारा आयएफएससी कोड, हयातीचा दाखला, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व संपर्क क्रमांक याची माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.