नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:34 PM2019-07-10T13:34:52+5:302019-07-10T13:34:57+5:30
४५ हजार शेतकºयांच्या याद्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या असून एकूण शेतकºयांचा आकडा १.५२ लाखांवर पोहचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आधी २ हेक्टरपर्यंतची मर्यादा ठरवून शासनाने शेतकऱ्यांना तीन टप्प्यात प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात सुधारणा करित नवे धोरण आखून २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारण करणाºया शेतकºयांनाही योजनेचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ४५ हजार शेतकºयांच्या याद्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या असून एकूण शेतकºयांचा आकडा १.५२ लाखांवर पोहचला आहे.
शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने शासनाने २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाºया पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात ६ हजार रुपये पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करून १ लाख ७ हजार पात्र शेतकºयांच्या याद्या आधीच शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केल्या होत्या. त्यातील बहुतांश शेतकºयांच्या बँक खात्यात पहिल्या व दुसºया टप्प्याची रक्कमही जमा झाली. यादरम्यान शासनाने २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणाºया शेतकºयांनाही योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे धोरण जाहीर केले. त्यानुषंगाने ४५ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून संबंधित शेतकºयांना लवकरच प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
११, १२ जुलै रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत संयुक्त व सामाईक खातेदारांपैकी पात्र, अपात्र कुटुंबांची, तसेच उर्वरित संकलित न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी ११ व १२ जुलै रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत माहिती संकलित केली जाणार असून ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिलेली नाही, अशांनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत व बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत गावचे तलाठी किंवा ग्रामसेवक, कृृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.