वाडी रायताळ येथे उडीद शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:41+5:302021-08-13T04:47:41+5:30
कृषी विज्ञान केंद्राद्वारे रिसोड तालुक्यातील मौजे वाडी रायताळ या गावामध्ये उडीद वाण पीडीकेव्ही ब्लॅक गोल्डच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. ...
कृषी विज्ञान केंद्राद्वारे रिसोड तालुक्यातील मौजे वाडी रायताळ या गावामध्ये उडीद वाण पीडीकेव्ही ब्लॅक गोल्डच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
रामकिसन त्रंबक पुंड यांनी शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित उडीद पीक प्रात्यक्षिकाच्या ठिकाणी शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सुधाकर मानवतकर, प्रगतिशील शेतकरी अर्जुन मानवतकर तर मार्गदर्शक म्हणून कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञ आर.एस. डवरे, एस.के. देशमुख तसेच कृषी सहायक आर.एन. नरवाडे मंचावर विराजमान होते. सरपंच मानवतकर यांनी शेतीत नवनवीन पद्धतींचा अंगीकार करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले, तर प्रमुख मार्गदर्शक तथा आर. एस. डवरे यांनी प्रात्यक्षिकाचे महत्त्व पटवून देत नवीन वाणाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या जातीचे, कीड रोग प्रतिकारक तसेच अधिक उत्पादन क्षमता असलेले बियाणे गावातच शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असे सांगतानाच परिसरातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून साधलेल्या प्रगतीची माहिती दिली.