हरभरा, तूरीचे अनुदान तातडीने देण्याची मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:34 PM2018-06-22T15:34:11+5:302018-06-22T15:34:11+5:30
वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार हरभरा, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत खरेदी होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्यासह शेतकºयांनी २२ जून रोजी शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली.
वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार हरभरा, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत खरेदी होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्यासह शेतकºयांनी २२ जून रोजी शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली.
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूरची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ तर हरभरा खरेदी १ मार्च २०१८ पासून सुरू केली होती. यासाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. विहित मुदतीत आॅनलाईन नोंदणी केल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक ३० हजार शेतकरी तर हरभरा उत्पादक सात हजार शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली नाही. १५ मे २०१८ पासून तूरीची खरेदी बंद झालेली आहे तर १४ जून २०१८ पासून हरभºयाची खरेदी बंद झालेली आहे. तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या; परंतू त्यांच्याकडून तूर व हरभºयाची खरेदी झाली नाही अशा शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय ५ मे २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. त्या अनुषंगाने तूर व हरभºयाची खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. सध्या खरिप हंगाम सुरू असल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना सदर अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरनाईक यांनी शुक्रवारी केली.
तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ४१ हजार ५८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार ६४८ शेतकºयांची एक लाख ४९ हजार ७९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर उर्वरीत ३० हजार ४१० शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ११ हजार ३७८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. १३ जूनपर्यंत ४ हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी झाली. उर्वरीत सात हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी बाकी आहे. आता मातीमोल भावाने तूर व हरभºयाची विक्री खासगी तसेच बाजार समित्यांमध्ये करावी लागत आहे.