वाशिम जिल्ह्यात २४ तासात वीज जोडणी देण्याचा प्रयोग फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 07:16 PM2017-11-29T19:16:38+5:302017-11-29T19:17:32+5:30

४ तासात वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. मात्र, विविध अटी पूर्ण करण्यातच नवीन ग्राहकांचा वेळ जात असल्यामुळे किमान आठवडभर मिटर लागण्यास वेळ लागत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात आहे.

Use of electricity connection in Washim district in 24 hours was in vain! | वाशिम जिल्ह्यात २४ तासात वीज जोडणी देण्याचा प्रयोग फसला!

वाशिम जिल्ह्यात २४ तासात वीज जोडणी देण्याचा प्रयोग फसला!

Next
ठळक मुद्देनागरिक त्रस्त मागणी करूनही आठवडाभर मिळत नाही मीटर

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम): महावितरणने गेल्या काही महिन्यांपूर्वी मागणी झाल्यास अवघ्या २४ तासांत वीजजोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप आणि आॅनलाईन प्रक्रियेचा आधार देखील घेण्यात आला. मात्र, नवीन ग्राहकांकडून मागणी झाल्यानंतर वेगवेगळ्या अटी पूर्ण कराव्या लागत असून किमान आठवडाभर तरी मीटर लागत नसल्याचे बोलले जात आहे. 
२४ तासात वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. वाशिम शहरातील रॉयल प्लाझा डी.पी., राणी लक्ष्मीबाई शाळा, बस स्टॅण्डजवळ, बोरा आॅईल मिल, शेळके हॉस्पीटल, बसस्टँड बुस्टर, गाभणे हॉस्पीटल, माउली नगर, आंबेडकर चौक, न्यू अल्लाडा प्लाट, वाशिमकर कॉम्प्ेक्स, पी.डब्ल्यू.डी.आॅफीस, न्यू गव्हानकर नगर, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर आॅफीस,  पोल्ट्रि फार्म, सिव्हील लाईन, जवाहर कॉलनी, न्यू आय.यू.डी.पी -१, न्यू आययूडीपी- २, न्यू आययूडीपी - ३, ४, मुजूमदार हाउस, दागडे हॉस्पीटल, कानडे हॉस्पीटल तहसिल आॅफीस, अल्लाडा प्लॉट, तिरुपती सिटी व नंदनवन कॉलनी, सर्किट हाउस, योजना कॉलनी, सुंदर वाटीका, ओरा हॉस्पीटल, दंडे हॉस्पीटल, बाहेती हॉस्पीटल, वाटाणेवाडी, बिसीएच  होस्टेल, राधाकृष्ण नगर, निकाल होस्टेल आदी ठिकाणी राहणाºया ग्राहकांना २४  तासात नविन विद्युत पुरवठा मिळणार असल्याचे महावितरणने जाहीर केले होते. मात्र, हा निर्णय हवेतच विरला असून आजही ग्राहकांना नवीन विद्यूत मीटर घेण्यासाठी महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

वीज जोडणीची मागणी करणाºया नवीन ग्राहकांनी रितसर ‘आॅनलाईन’ स्वरूपातील अर्ज करून कागदपत्रांची पुर्तता केल्यास त्यांना २४ तासांतच जोडणी देण्यास महावितरण कटिबद्ध आहे. यासाठी मात्र ग्राहकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि तेच नेमके मिळत नसल्याने नवीन विद्यूत जोडणी देण्यास विलंब लागतो.
- व्ही.बी.बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम
 

Web Title: Use of electricity connection in Washim district in 24 hours was in vain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.