जहाल कीटकनाशकांचा वापर टाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:13+5:302021-06-30T04:26:13+5:30
खरीप हंगामात जवळपास ८५ टक्क्यांच्या वर पेरणी आटोपली आहे. अनेक ठिकाणी बीजांकुर जमिनीबाहेर आले आहेत. कीड नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकांची ...
खरीप हंगामात जवळपास ८५ टक्क्यांच्या वर पेरणी आटोपली आहे. अनेक ठिकाणी बीजांकुर जमिनीबाहेर आले आहेत. कीड नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. जहाल कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा तसेच कृषीसेवा केंद्रानीही या कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले. मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अमरावती विभागातील यतवमाळ जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी हा प्रकार गंभीर झाला होता. हा प्रकार घडण्यामागे जहाल कीटकनाशकांचा वापर ही गंभीर बाबही निदर्शनात आली आहे. लाल त्रिकोणाची खूण असलेली कीटकनाशके मानवी आरोग्यास घातक असून, उपरोक्त कीटकनाशके त्याच प्रकारात मोडतात. त्यामुळे अशा कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा, असे आवाहन कृषी अधिकारी भद्रोड यांनी केले.