प्लास्टिक पन्नीचा वापर सर्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:48+5:302021-01-14T04:33:48+5:30
मानोरा : मानोरा शहरात गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पन्नीचा वापर सर्रास होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून प्लास्टिक ...
मानोरा : मानोरा शहरात गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पन्नीचा वापर सर्रास होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून प्लास्टिक पन्नी वापरणाऱ्यांविरुद्ध कड़क करवाई करण्याची गरज असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
तत्कालीन पर्यावरण मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली होती. त्यावेळी सर्वत्र कड़क नियम केले होते. अनेकांवर करवाईचा सपाटा लावला होता. मानोरा नगर पंचायतच्यावतीने शहरात प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली होती. काही दुकानदारांना दंडदेखिल करण्यात आला होता. परंतु आता ही मोहीम थंड़ावली आहे. आता सर्रास अनेक दुकानात, भाजी बाजारात, फळ विक्रेते, मांस विक्रेते, किराणा दुकानात प्लास्टिक पन्नी दिली जात आहे. नागरिकही पन्नीचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. आजही प्लस्टिक बंदी आहे, परंतु त्याचे पालन होताना दिसत नाही. प्रशासनाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून केली जात आहे.
.......................
कोट :
मानोरा नगर पंचायतच्यावतीने प्लास्टिक बंदीबाबत सूचना दिल्या आहेत. कारवाईसुद्धा केली जात आहे. पन्नी वापरू नये याकरिता कार्यक्रम राबविण्यात आले. आता नागरिकांनी जागरूक होऊन स्वत:हून पन्नीचा वापर टाळला पाहिजे. स्वयंसेवी संस्थेमार्फत कापड़ी पिशव्या शिवून त्या बाजारात वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला जाईल.
- नीलेश गायकवाड़
मुख्याधिकारी, नगर पंचायत, मानोरा.