दर्जेदार उत्पन्नासाठी गांडूळ खताचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:44+5:302021-07-05T04:25:44+5:30
या संदर्भातील पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, गांडूळ खत वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो. ...
या संदर्भातील पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, गांडूळ खत वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो. जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो. उत्पादन क्षमता आणि जमिनीची सच्छिद्रता वाढीस लागते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य होते. जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढून जैव-रासायनिक क्रिया वेगाने होतात. गांडूळ खतामुळे उपयुक्त जीवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते. पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासह उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे शेतमालाला जास्त बाजारभाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करून, फायदेशीर असलेल्या गांडूळ खताचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
....................
पोकरा योजनेतून मिळते गांडूळ खत युनिट
केंद्र व राज्य शासनाच्या मग्रारोहयो, तसेच पोकरा योजनेतून गांडूळखत युनिट आणि नाडेप युनिट उभारता येऊ शकते. त्यासाठी शासनाकडून ठरावीक साहाय्यही पुरविले जाते. याविषयी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तोटावार यांनी केले.