सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:51 PM2017-10-10T19:51:52+5:302017-10-10T19:52:36+5:30
वाशिम: जिल्ह्यात यंदा ७० टक्के पर्जन्यमान झाल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पाची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता यावी, यासाठी सर्वच प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात जून २०१७ या महिन्यापासून अधूनमधून पाऊस कोसळलाही; परंतू पुरसदृष स्थिती एकदाही उद्भवली नाही. वाहता पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले-ओढे, सिंचन प्रकल्पांमध्ये फारच अल्प प्रमाणात पाण्याचा शिरकाव झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून आगामी डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यापासून जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत मिळत आहेत. ही बाब लक्षात घेवून आतापासूनच नियोजनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघू अशा सर्वच सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे.