लॉकडाऊनचा सदुपयोग; दाम्पत्याने २१ दिवसात अंगणात खोदली विहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:16 AM2020-04-19T11:16:10+5:302020-04-19T11:19:58+5:30

वेळेचा सदुपयोग मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने करुन दाखविला.

 Utilization of lockdown; The Couple dug well in the courtyard within 21 days | लॉकडाऊनचा सदुपयोग; दाम्पत्याने २१ दिवसात अंगणात खोदली विहिर

लॉकडाऊनचा सदुपयोग; दाम्पत्याने २१ दिवसात अंगणात खोदली विहिर

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊन मध्ये पंचविस फुट विहीर खोदुन काढली . गोड पाणी लागले लागल्यानंतर यांचा आनंद गगनात मावेनासे झाला. गावकऱ्यांनी या पतीपत्नीच्या कार्याचे कौतूक केले.

- बबनराव देशमुख  
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणुमुळे लॉक डाऊन करण्यात आले. जिल्हयातही संचारबंदी लागू केल्याने कुठेही जाता येणे शक्य नाही. अशातही आपला वेळ सदुपयोगी लावणारे अनेक जण पहावयास मिळतात. असाच वेळेचा सदुपयोग मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने करुन दाखविला. लॉक डाउननंतर २१ दिवसात पती पत्नीने विहिर खोदली.
 कोराणाचा फैलाव होऊ नये म्हणून नागरीकानी कोणीही घरा बाहेर पडता कामा नये, या साठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. घरात बसून काय करायचे असा प्रश्न पडल्यावर तालुक्यातील कारखेडा येथील पती पत्नीने घराच्या अंगणात चक्क एकविस दिवसात विहीरच खोदुन टाकली.  आता पर्यत च्या इतिहासात पहिल्यांदाच मिळालेल्या विश्रांतीच सोन केल.
कारखेडा येथे अठ्ठावीस गावे पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत आहे; परंतु हि योजना या ना त्या कारणाने जास्त काळ बंदच राहते. याधी रस्त्याच्या कामामुळे तर आता पुरवठा योजनेचा पाईप लाईन फुटल्यामुळे हि योजना बंद होती . त्यामुळे सर्वच पाण्यासाठी ञस्त झाले होते . संचारबंदी असल्यामुळे पाण्यासाठी बाहेर जाण्याची भिती , बाहेर गेले तर पोलिस तर करायचे काय या विवंचनेत असलेल्या गजानन नारायणराव पकमोडे व त्यांची पत्नी पुष्पा गजानन पकमोडे यांनी चक्क एकविस दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये पंचविस फुट विहीर खोदुन काढली . विहीरीला गोड पाणी लागले लागल्यानंतर यांचा आनंद गगनात मावेनासे झाला.
गजानन पकमोडे हे व्यवसायाने गवंडी काम करत असल्यामुळे सतत कामात राहण्याची सवय. परंतु लॉकडाऊन मुळे घरातच बसुन करायचे काय हा प्रश्न पडला व एक दिवस पतीपत्नीमध्ये सहज चर्चा झाली व विहिर खोदण्याचे ठरविले. ‘केल्याने होते रे आधी केले पाहिजे ’ या उक्तीप्रमाणे जसजसा वेळ मिळत गेला तसतसे काम करुन २१ दिवसात विहिर खोदून टाकली. गावकऱ्यांना हि बाब कळाल्यानंतर गावकऱ्यांनी या पतीपत्नीच्या कार्याचे कौतूक केले.

Web Title:  Utilization of lockdown; The Couple dug well in the courtyard within 21 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.