पदे रिक्त; कामकाज प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:50+5:302021-06-01T04:30:50+5:30
००००० उकळीपेन येथे दोन कोरोना रुग्ण वाशिम : वाशिम तालुक्यातील उकळीपेन येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३० ...
०००००
उकळीपेन येथे दोन कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील उकळीपेन येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३० मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात आली.
०००००
रस्ता अरूंद; वाहतूक प्रभावित
मालेगाव : मालेगाव शहरातील अरूंद रस्ते आणि त्यातच रस्त्याच्या कडेला ऑटो, दुचाकी वाहनांची पार्किंग केली जात असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे.
मालेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाही.
00
पाणंद रस्त्याची दुरवस्था
वाशिम : मालेगाव तालुक्यातील राजूरा परिसरात राजूरा, पिंपळवाडी ते खैरखेडा या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात शेतात जाताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खडीकरण किंवा मजबुतीकरण झालेला पाणंद रस्ता नाही.
000
जऊळका येथे नागरिकांची आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आणखी एका जणाला कोरोना संसर्ग झाल्याचे रविवार, ३० मे रोजी निष्पन्न झाले. आरोग्य विभागातर्फे जऊळका परिसरात नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
००००
अनुदान मिळेना; लाभार्थी अडचणीत !
वाशिम : रमाई आवास योजनेंतर्गत कवठा जिल्हा परिषद गटातील जवळपास २० लाभार्थींना गतवर्षातील अनुदान अद्याप मिळाले नाही. परिणामी, घरकुलांची कामे प्रभावित झाली असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींनी सोमवारी केली.