महसूल विभागात महत्त्वाची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:48+5:302021-06-27T04:26:48+5:30

................ निवासस्थानांची दुरुस्ती करण्याची मागणी वाशिम : मंगरूळपीर येथील पोलीस कर्मचारी निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाकडे दुरुस्तीचा ...

Vacancies in the revenue department | महसूल विभागात महत्त्वाची पदे रिक्त

महसूल विभागात महत्त्वाची पदे रिक्त

Next

................

निवासस्थानांची दुरुस्ती करण्याची मागणी

वाशिम : मंगरूळपीर येथील पोलीस कर्मचारी निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविलेला आहे; मात्र अद्याप हा प्रश्न निकाली निघालेला नाही.

...................

पथक प्रमुखांकडे देयकांसंबंधी तक्रारी

वाशिम : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून देयकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहेत. त्यानुसार, पथक प्रमुखांकडे देयकांसंबंधी तक्रारी केल्या जात आहेत.

..............................

धूर फवारणी करण्याची मागणी

वाशिम : शहरातील आययूडीपी काॅलनी परिसरात सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास प्रतिबंधक धूर फवारणी करणे गरजेचे ठरत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संजय बनसोड यांनी गुरुवारी न.प.कडे केली.

........................

धोकादायक पुलाच्या दुरुस्तीची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी या गावावरून मेडशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीवर असलेला पूल धोकादायक अवस्थेत आहे. सुरक्षा कठडे तुटल्याने प्रश्न गंभीर झाला आहे.

.................

जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर सुविधांचा अभाव

वाशिम : पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल भरायला येणाऱ्या ग्राहकांसाठी पंपचालकाने विविध स्वरूपातील सुविधा पुरविणे आवश्यक आहे; मात्र बहुतांश पेट्रोलपंपांवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

..............

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

वाशिम : मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीपात्रात बऱ्यापैकी जलसाठा झालेला आहे. यामुळे नदीच्या पाण्याव्दारे तहान भागविणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

............

रस्ते पूर्णत्वास; वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष

वाशिम : येथून मालेगावकडे जाणाऱ्या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून रस्ता नूतनीकरण करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आली; मात्र नव्याने वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

..............

जऊळका येथे प्रवाशांची गैरसोय

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून जऊळकामार्गे धावणारी पॅसेंजर रेल्वे बंद आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

..............

वाहन चालकांवर धडक कारवाई

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर शुक्रवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करत दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे कळविण्यात आले.

............

भाजीपाला उत्पादक पुन्हा धास्तावले

वाशिम : शिरपूर जैन (ता.मालेगाव) येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत आहेत. कोरोनामुळे व्यवसाय होत नसल्याने ते अडचणीत सापडले होते. आता पुन्हा सोमवारपासून निर्बंध लागू होणार असल्याने ते धास्तावले आहेत.

................

हातपंप दुरुस्त करण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गाव परिसरात पर्यायी व्यवस्था म्हणून हातपंपांचा ग्रामस्थांना आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त असलेला हातपंप दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

.......................

रस्त्याचे काम प्रलंबित; नागरिक त्रस्त

वाशिम : शहरातील नंदीपेठ भागात रस्त्याचे काम प्रलंबित आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक नगर परिषदेने हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी निखिल बुरकुले, आकाश कुटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

...............

लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करा!

वाशिम : कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी लक्षणे दिसून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी येथे गुरुवारी केले.

...............

रस्ता निर्मितीच्या कामाची प्रतीक्षा

वाशिम मालेगाव तालुक्यातील बेलखेडा ते पार्डी तिखे, येवती ते रिठद, शिरसाळा ते रिठद या रस्ता निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्ष काम कधी होणार, याबाबतची प्रतीक्षा मात्र कायम आहे.

.........................

थकबाकीदार ग्राहकांवर धडक कारवाई

वाशिम : परिसरातील घरगुती वीज ग्राहकांकडे लाखो रुपयांची विद्युत देयके थकीत आहेत. वारंवार आवाहन करूनही देयके अदा होत नसल्याने अखेर महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

.......................

प्रवाशांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन

वाशिम : खासगी वाहनांव्दारे ग्रामीण भागात प्रवास करीत असलेले अनेकजण खबरदारी बाळगत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

.............

वाहतूक सुरळीत करण्याची मागणी

वाशिम : शहरातील पाटणी चौक व रिसोड नाका येथे दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. त्याचा रहदारीलाही अडथळा निर्माण होत असून ही समस्या सोडविण्याची मागणी गणेश मुळे यांनी शुक्रवारी पोलिसांकडे केली.

....................

खाद्यान्न सुरक्षा जनजागृतीस ‘खो’

वाशिम : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. प्रशासकीय पातळीवरून यासंबंधी कुठलीच जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक देखील दरमहा होत नसल्याचे दिसत आहे.

......................

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

वाशिम : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Vacancies in the revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.