मोकळा प्लाॅट सांभाळणे झाले कठीण; वर्षभरात १०० प्लाॅट हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:11+5:302021-06-19T04:27:11+5:30

खुल्या प्लाॅटवर अनधिकृत पद्धतीने ताबा केल्यानंतर मूळ मालकाने तक्रार केल्यास ताबा सोडण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींची ...

The vacant plot became difficult to handle; 100 plots were seized during the year | मोकळा प्लाॅट सांभाळणे झाले कठीण; वर्षभरात १०० प्लाॅट हडपले

मोकळा प्लाॅट सांभाळणे झाले कठीण; वर्षभरात १०० प्लाॅट हडपले

googlenewsNext

खुल्या प्लाॅटवर अनधिकृत पद्धतीने ताबा केल्यानंतर मूळ मालकाने तक्रार केल्यास ताबा सोडण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे मोकळा प्लाॅट सांभाळणे कठीण बाब झाली असून मूळ मालकांना प्लाॅटच्या चारही बाजूंनी अतिक्रमण करू नये, असा फलक लावण्यासोबतच तार कंपाऊंड करून ठेवावे लागत असल्याचे दिसत आहे.

..............

एकच प्लाॅट अनेकांना विकला

वाशिम शहरातील काही भागात एकच प्लाॅट अनेकांना विकल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे.

यासंदर्भात गेल्या दोन वर्षांत वाशिम नगर परिषदेकडे मूळ मालकांनी तक्रार दाखल केली; मात्र या धंद्यात पारंगत असलेल्या भूखंड माफियांनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे अनेकांना न्याय मिळालेला नाही.

...................

आरोपी-पोलीस-महसूल

शहराच्या बाहेर विकसित होऊ पाहत असलेल्या खुल्या जागांवर मोकळा प्लाॅट घेऊन ठेवायचा आणि पुरेशा प्रमाणात जवळ पैसे आले की तो बांधून त्या ठिकाणी वास्तव्याला जायचे, अशी मनीषा अनेकजण बाळगून असतात.

प्रत्यक्षात मात्र केवळ प्लाॅट घेऊन ठेवायचा आणि त्याकडे अनेक महिने फिरकूनही पाहायचे नाही, ही बाब घातक ठरू शकते. अनधिकृत पद्धतीने प्लाॅटची खरेदी-विक्री करण्यात माहीर असलेल्यांकडून प्लाॅट हडपला जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

विशेष गंभीर बाब म्हणजे पोलीस विभाग आणि महसूलमधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्लाॅट हडपण्याचा गोरखधंदा गेल्या काही वर्षांत तेजीत आला आहे. त्यामुळे मूळ मालकांनी गाफील राहू नये, असा सूर उमटत आहे.

...................................

प्लाॅट असल्यास ही घ्या काळजी

प्लाॅट घेऊन ठेवल्यास भविष्यात त्याचे दर वाढणारच, या अपेक्षेने अनेकजण पैसे गुंतवितात; मात्र काही लोकांकडून परस्पर प्लाॅट हडपला जात असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

ही बाब लक्षात घेता प्लाॅटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्यास सिमेंटचे खंबे गाडून तार कुंपण करून घेणे आवश्यक ठरत आहे.

याशिवाय प्लाॅटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लाॅटवर कोणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास चुकीच्या प्रकारांना बहुतांशी आळा बसू शकतो, असे वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी सांगितले.

.....................

प्लाॅट परस्पर हडपण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. यासंदर्भात तक्रार झाल्यास संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केला जातो. प्लाॅटच्या मूळ मालकांनीही सतर्क राहायला हवे.

- धृवास बावनकर, ठाणेदार, वाशिम

..............

प्लाॅट खरेदीसाठी लाखो रुपये गुंतविल्यानंतर प्लाॅटचा सांभाळ करणेही गरजेचे आहे. त्यानुषंगाने पक्की नोंदणी करून घेणे, प्लाॅटला तार कुंपण करणे, त्या ठिकाणी मूळ मालकांच्या नावाचा फलक लावणे अशा काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष पुरवायला हवे.

- विजय साळवे, तहसीलदार, वाशिम

..................

प्लाॅट हडपल्याच्या तक्रारी

२०१९ - ५४

२०२० - ३५

२०२१ मे पर्यंत - १९

Web Title: The vacant plot became difficult to handle; 100 plots were seized during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.