आठवी ते बारावीच्या शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:55+5:302021-07-17T04:30:55+5:30

जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ३६३ शाळा आहेत. या शाळांवर २९०६ शिक्षक असून, त्यापैकी शंभर टक्के शिक्षकांनी लसीचा पहिला ...

Vaccination of 100% teachers from 8th to 12th standard | आठवी ते बारावीच्या शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण

आठवी ते बारावीच्या शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण

Next

जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ३६३ शाळा आहेत. या शाळांवर २९०६ शिक्षक असून, त्यापैकी शंभर टक्के शिक्षकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर ९९ टक्के शिक्षकांनी दुसराही डोस घेतला आहे. जिल्ह्यात ७३ शाळा उघडण्यात आल्या आहेत. या शाळांतील सर्व शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. तथापि, खबरदारी म्हणून दुसरा डोस न घेतलेल्या १ टक्का शिक्षकांना रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करूनच शाळेत येण्याचा सल्ला देण्यात आला आहे किंवा दुसऱ्या डोसचा कालावधी झाला असेल, तर डोस घेऊनच शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

----------------

१) आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक - २९०६

- पहिला डोस झालेले शिक्षक - २९०६

- दोन्ही डोस झालेले शिक्षक - २८७३

- पहिल्या दिवशी टेस्टिंग करून शाळेत आलेले शिक्षक - ००

-----------

२) पहिल्या दिवशी ११ टक्के विद्यार्थ्यांचा... एक साथ नमस्ते!

वर्ग - मुले - मुली - एकूण

आठवी - १४७० - १४५९ - २९२९

नववी - १४२३ - १३८४ - २८०७

दहावी - १३०५ - १२९० - २५९५

अकरावी - ०० - ०० - ००

बारावी - ०० - ०० - ००

३) पहिल्या दिवशी ७३ शाळा उघडल्या

शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींच्या नाहरकत प्रमाणपत्रानंतरच कोरोनामुळे गावातील शाळा सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यात केवळ ७३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आल्याने पहिल्या दिवशी १५ जुलैला ७३ शाळा उघडल्या. या सर्व शाळांत कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

४) एक दिवसात चाचणी करायची कशी?

कोट:

आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या शिक्षकांना चाचणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. आरटीपीसीआर चाचणीला वेळ लागतो. अशात रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचा पर्याय शिक्षण विभागाने ठेवला आहे.

- संदीप देशमुख, शिक्षक, (16६ँ08)

--------------

कोट:

आठवी ते बारावीच्या ७३ शाळा जिल्ह्यात सुरू केल्या आहेत. या शाळा सुरू करण्यापूर्वी ९९ टक्के शिक्षकांचे लसीकरण झालेच आहे. आता केवळ १ टक्का शिक्षकांनी दुसरा डोस घेतला नाही. अशा शिक्षकांसाठी तातडीचा पर्याय म्हणून रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यास मुभा देण्यात आली आहे.

- राजेश गोटे, शिक्षक (16६ँ07)

------------------

५) शिक्षणाधिकारी कोट

कोट:

जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यातील १०० टक्के शिक्षकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ९९ टक्के शिक्षकांनी दुसराही डोस घेतला आहे. एक टक्का शिक्षकांचा दुसरा डोस राहिला असून, त्यांना रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचा सल्ला देण्यात आला आहे.

- रमेश तांगडे,

माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

---------

Web Title: Vaccination of 100% teachers from 8th to 12th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.