भर जहागीर येथे एकाच दिवशी ५२८ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:18+5:302021-07-24T04:24:18+5:30
भर जहागीर - समता फाउंडेशनच्या माध्यमातून शहरासह आता ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये कोरोना विषाणू संदर्भात लसीकरण मोहीम राबविण्यात येत ...
भर जहागीर - समता फाउंडेशनच्या माध्यमातून शहरासह आता ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये कोरोना विषाणू संदर्भात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. भर जहागीर येथील ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ५२८ नागरिकांना कोविशिल्डचे लसीकरण २३ जुलै राेजी करण्यात आले.
येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी ९ वाजता पासून समता फाउंडेशनचे सुरज गुप्ता, मिलिंद प्रधान, शिवानी उखळकर, विनोद मोरे, सोपनिल खांदळे, आकाश आंबेकर, आरती साळवे यांची चमू दाखल झाली. ग्रामपंचायत सरपंच पी. के. चोपडे, उपसरपंच काळदाते, प्रा. पंढरीनाथ चोपडे, महादेव क्षीरसागर, अनिल गरकळ यांनी स्वागत करीत लसीकरण करण्याला प्रारंभ झाला. यावेळी गावातील महिला,पुरूष,युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकाच दिवशी सुमारे ५२८ नागरिकांनी लस घेतली. यामध्ये पुरूष २८६ तर महिला २४२ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी ग्रामपंचायतसह नागरिकांनी समता फाउंडेशनच्या कोविशिल्ड लसीकरणाच्या महायज्ञाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.