वाशिममध्ये लसीकरण जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:35+5:302021-05-24T04:39:35+5:30
२३ मे रोजी शहरातील नंदीपेठ प्रभागात घरोघरी जाऊन घरातील ज्येष्ठ सदस्य तथा युवकांनी लस घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यासह ...
२३ मे रोजी शहरातील नंदीपेठ प्रभागात घरोघरी जाऊन घरातील ज्येष्ठ सदस्य तथा युवकांनी लस घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यासह लसीविषयी असणारे गैरसमज दूर करून कोरोना महामारीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी १८ वर्षावरील सर्वांनी तसेच विशेषत: ४८ वर्षावरील ज्येष्ठांनी त्वरित लस घ्यावी, यासाठी त्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्याचा चांगला फायदा होऊन, नंदीपेठ प्रभागातील तब्बल २०० नागरिकांनी लस घेण्यासाठी नावनोंदणी केली असून त्या सर्वांना सोमवारी, २४ मे रोजी लस देण्यात येणार आहे.
या मोहिमेत राजू वानखेडे यांच्यासह संजय इंगोले, गोपाल काठोळे, श्रीराम दरणे, गोविंद विभुते, सुभाष धोंगडे, महेश धोंगडे, अनिल देशमुख, अरुण धोंगडे, दत्ता गंगाळे, यश देशमुख, प्रभाकर शिंदे, जुल्फकार, नितीन भुतकर परिश्रम घेत आहेत.