दापुरा येथे लसीकरणाला सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:54+5:302021-04-06T04:40:54+5:30
गेल्या १६ जानेवारीपासून संपूर्ण भारतात लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली ...
गेल्या १६ जानेवारीपासून संपूर्ण भारतात लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली व त्यांनंतर ६० वर्षांवरील व व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्यात आले व आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करणे सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, कुपटाअंतर्गत दापुरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत अलोपॅथिक दवाखाना दापुरा येथे ५ एप्रिलपासून लसीकरण सुरू करण्यात आले व पहिल्याच दिवशी २४२ जणांना लसीकरण करण्यात आले. यावेळी कुपटा आरोग्य केंद्राचे इंचार्ज मेडिकल ऑफिसर डॉ. रवींद्र ठाकूर, भोयनी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश आडे, मानकर, कानडे आरोग्य सहायक कुपटा, माजी पं. स. सदस्य मधुसूदन राठोड, ग्रा. पं. पदाधिकारी, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक डेरे, काळे, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. दापुरा येथे पहिल्याच दिवशी २४२ जणांना लसीकरण करण्यात आले. याच प्रमाणे तालुक्यातील इतर नागरिकांनी सुद्धा लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व स्वतः सुरक्षित होऊन आपल्या परिवारास सुरक्षित ठेवावे, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले.