दापुरी येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:16+5:302021-06-21T04:26:16+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तहसीलदार अजित शेलार व मांगुळझनक उपकेंद्रचे डॉ. भुतडा, ग्रा.पं.च्या पुढाकाराने दापुरी येथे आयोजित लसीकरण शिबिरादरम्यान ...

Vaccination camp at Dapuri | दापुरी येथे लसीकरण शिबिर

दापुरी येथे लसीकरण शिबिर

Next

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तहसीलदार अजित शेलार व मांगुळझनक उपकेंद्रचे डॉ. भुतडा, ग्रा.पं.च्या पुढाकाराने दापुरी येथे आयोजित लसीकरण शिबिरादरम्यान गावकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यात आले. गावामध्ये फिरुन लाऊडस्पिकरच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लस महत्त्वाची आहे. ३० वर्षावरील नागरिकांना कोविड लसीबाबत गैरसमज दूर करून नागरिकांना लस घेण्याकरिता प्रोत्साहित केले. ५३ नागरिकांना लस देण्यात आली असून ३० वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करून शासनाला व ग्रा.पं.ला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी तलाठी बायस्कर, ग्रामसेवक भगत, उपसरपंच प्रायगबाई जाधव, पोलीस पाटील मंजुषाबाई खरात, डॉ . भुतडा, गवई, आरोग्य सेवक बोरकर, राजुभाऊ जाधव, भागवतराव लोखंडे, आशा वर्कर शारदाबाई सरनाईक, अंगणवाडी सेविका शारदाबाई बेद्रे, रेखाबाई जाधव, संगणक ऑपरेटर भागवत देशमुख, संतोष पवार, ग्रा.पं. कर्मचारी विनायक सरनाईक आदींची उपस्थिती होती.

Web Title: Vaccination camp at Dapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.