करडा येथे लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:37+5:302021-04-27T04:42:37+5:30
कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग मोप व ग्रामपंचायत करडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर ...
कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग मोप व ग्रामपंचायत करडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी १०८ लसीचे डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी १०८ लोकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविला. त्यामुळे १०० टक्के लसीकरण झाले. तरीसुद्धा गावामध्ये काही लोकांना डोस देणे बाकी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिबिर आयोजित करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. यासाठी आरोग्य सहायक जी. पी. पदमने, सरपंच गंगाताई देशमुख, उपसरपंच गजानन देशमुख, सचिव एस. के. अवचार, आरोग्यसेवक एस. पी. पिसे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जीवन देशमुख, पंचायत समिती सदस्य संदीप धांडे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच प्राध्यापक वसंतराव देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य सेविका डी. आर. चुंगडे यांनी लोकांना लसीचा डोस दिला. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी भागवतराव देशमुख, संगणक चालक राजेंद्र देशमुख, कोतवाल ब्रह्मदेव धांडे, रोजगार सेवक अमोल देशमुख, अंगणवाडी सेविका नबुताई देशमुख, रेखाताई मोरे, मदतनीस शोभा धांडे, आशासेविका शीलाताई देशमुख, वैशाली देशमुख यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच गंगाताई देशमुख यांनी स्वत: डोस घेऊन ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी, आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर पडू नका, आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे, अशा प्रकारे आवाहन केले.