जनुना येथे लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:58+5:302021-06-10T04:27:58+5:30
या गावातील ४५ वर्षांवरील ७० लाभार्थींपैकी केवळ एकाच लाभार्थीने लसीकरण करून घेतले होते. यापूर्वी २७ मे रोजी आयोजित लसीकरण ...
या गावातील ४५ वर्षांवरील ७० लाभार्थींपैकी केवळ एकाच लाभार्थीने लसीकरण करून घेतले होते. यापूर्वी २७ मे रोजी आयोजित लसीकरण शिबिरात एकाही नागरिकाने लसीकरण करून घेतले नव्हते. म्हणून परत ८ जूनरोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी जनूना गावातील प्रत्येकांच्या घरी जाऊन लसीबाबत नागरिकांचा असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. जनुना येथे १०० टक्के नागरिकांचा लसीकरणाला विरोध आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागातर्फे करण्यात आला. ६९ पैकी १० नागरिकांनी लस घेतली आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत, पांडुरंग कोठाळे, पंचायत समिती सदस्य गणेश पवार, सरपंच भागवत काळे, पोलीसपाटील उमेश वाघमारे, सचिव संजय पाचरणे, तलाठी पांडे, शिक्षक लाखे यांची उपस्थिती होती. आरोग्य पथकामध्ये डॉ. बोरकर, तायडे, देविचंद राठोड, संदीप नप्ते, गजानन पवार, दिलीप धंदरे, सुवर्णा चव्हाण, कविता गोदमले यांच्यासह आशा स्वयंसेविकांचा समावेश होता.