समता फाउंडेशनकडून गोभणी येथे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:26 AM2021-07-19T04:26:06+5:302021-07-19T04:26:06+5:30
समता फाउंडेशनकडून आयोजित शिबिरात गोभणी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले. तसेच गावातील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित ...
समता फाउंडेशनकडून आयोजित शिबिरात गोभणी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले. तसेच गावातील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी यावेळी घेण्यात आली. या शिबिरादरम्यान १८ वर्षे वयावरील सर्वांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. या शिबिरात जवळपास ९० टक्के गावकऱ्यांनी सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वी करण्यासाठी गोभणी ग्रामपंचायत सरपंच सविता शेषराव राऊत, उपसरपंच अशोकराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संदीप घायाळ, योगेश हुले, गणेश इंगळे, शेख अतिक लतीफ, राजेश साबळे, अर्चना जावळे, गजानन साबळे तथा ग्रामपंचायत सचिव डी. पी. चांदणे, पोलीस पाटील दुर्गादास खोडवे, आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह समता फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.