ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे लसीकरण अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:20+5:302021-02-27T04:55:20+5:30
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी काम करणाऱ्या १० हजार ५४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यात ...
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी काम करणाऱ्या १० हजार ५४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यात शासकीय आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांसाठी ४ हजार १५०, खासगी आरोग्य संस्थांमधील १ हजार ८५८, पोलीस विभागातील २ हजार १२७, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ६३६, महसूल विभागातील ९१०, तर ग्रामीण स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतमधील कोरोना योद्ध्यांसाठी ८१० लसींचे उद्दिष्ट होते. आरोग्य विभाग, पोलीस, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसोबतच ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला प्रतिसाद मिळत असल्याने लसींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
------
कारपा येथे लसीकरणाला प्रतिसाद
मानोरा पंचायत समितीअंतर्गत कारपा येथी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यात ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक इंद्रगोल राठोड, पाणीपुरवठा समाधान कांबळे, ग्रामपंचायत शिपाई महेश चव्हाण यांना वाशिम येथील रेनाल्ड मेमेरियाम हॉस्पिटल येथे लस टोचण्यात आली.