घरोघरी फिरून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:25+5:302021-02-06T05:18:25+5:30
^^^ मानोऱ्या आणखी पाच बाधित वाशिम : मानोरा तालुक्यात आणखी पाच जणांना कोरोना संसर्ग झाला असून, शुक्रवारी आरोग्य विभागाकडून ...
^^^
मानोऱ्या आणखी पाच बाधित
वाशिम : मानोरा तालुक्यात आणखी पाच जणांना कोरोना संसर्ग झाला असून, शुक्रवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार मानोरा शहरातील ४, म्हसणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संबंधित परिसरात तपासणी सुरू केली आहे.
^^^^^
रस्त्यावर गटार, आरोग्याला धोका
धनज बु. : गावातील मुख्य रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचे काम योग्यरीत्या करण्यात आले नाही, तसेच नाल्यांची नियमित सफाई नसल्याने रस्त्यावर गटार साचत आहे. त्यातच गावातील भवानी माता मंदिरामागील परिसरात वाहून येणाऱ्या घाण पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरील गटारातूनच ग्रामस्थांना येजा करावी लागत आहे.
----
वन्यप्राण्यांकडून मका पिकाचे नुकसान
मेडशी : परिसरात सध्या रबी हंगामातील मक्याचे पीक बहरले असून, हरीण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे ५ फेब्रुवारी रोजी दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
-------
घरकूल अनुदान रखडले
वाशिम : मानोरा पं.स.अंतर्गत येत असलेल्या ग्रा.प.तळप बु. येथील अनुसूचित जातीमधील नऊ लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेअंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले; परंतु वर्ष उलटत आले तरी या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकूल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही.