काजळेश्वरात लसीकरणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:20+5:302021-06-19T04:27:20+5:30
काजळेश्वर उपाध्ये : कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये, याकरिता ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना काजळेश्वर येथे लसीकरण जि.प. प्राथमिक शाळेत आरोग्य ...
काजळेश्वर उपाध्ये : कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये, याकरिता ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना काजळेश्वर येथे लसीकरण जि.प. प्राथमिक शाळेत आरोग्य विभाग काजळेश्वर राबवत आहे.
आरोग्य पथकासह पं.स. सदस्य रंगराव धुर्वे लसीकरणाला प्रतिसाद मिळावा, याकरिता गावात जनजागृती अभियान राबवून लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत.
कोरोनाला प्रतिबंध
करण्यासाठी व कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कोरोना प्रतिबंध व्हावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत लसीकरण काजळेश्वर आरोग्य पथक शिबिर
राबवत आहे. पं.स. सदस्य रंगराव धुर्वे, आरोग्य पथक, अंगणवाडी कर्मचारी, आशासेविकांसह जनजागृती अभियानात
सहभागी झाले आहेत. सध्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना पहिला डोस, तर ८४ दिवसांनंतरच्या कोविशिल्डच्या दुस-या डाेसचे लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य पर्यवेक्षक ए.जी. सोनोने यांनी दिली आहे. लसीकरण यशस्वी करण्यास रंगराव धुर्वे यांचे सहआरोग्य कर्मचारी ए.जी. सोनोने, संदीप खुळे, कैलास पा. उपाध्ये, योगिता वानखडे, मंजू जाधव, अंगणवाडी कर्मचारी, आशावर्कर यांचा समावेश आहे.