कारखेडा गावचे लसीकरण अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:35+5:302021-05-08T04:43:35+5:30
कोरोना महामारीपासून आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसीलदार शारदा जाधव व गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे ...
कोरोना महामारीपासून आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसीलदार शारदा जाधव व गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्या मार्गदर्शनात कारखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी लसीकरणाचा सपाटा लावला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे जवळपास ९५ टक्के लसीकरण पूर्ण केल्यानंतर उर्वरित राहिलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची टीम घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जाते. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत ग्रामपंचायतने स्वत: ऑटो लावून ३५ नागरिकांचे लसीकरण करून घेतले. आणखी ही मोहीम व्यापक करून गावात १०० टक्के लसीकरण करण्याचा मानस आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश राठोड, डॉ. ललित हेडा यांनी विशेष सहकार्य केले. यासाठी सरपंच सोनाली बबनराव सोळंके, उपसरपंच अनिल सीताराम काजळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, ग्रामपंचायत सदस्य मनोज किशोर तायडे, गणेश जाधव, प्रमिला राजू चव्हाण, चैताली विवेक परांडे, ग्रामसेवक अनिल सूर्य, तलाठी सागर चौधरी, कृषी सहायक अश्विनी सुरजुसे, जि.प. शिक्षक गोविंद पोतदार, रणजित जाधव, वैभव कांबळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका अथक परिश्रम घेत आहेत.