काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण आवश्यक - डाॅ. हरिष बाहेती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 07:25 PM2021-04-01T19:25:49+5:302021-04-01T19:25:57+5:30

Lokmat Interview : नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डाॅ. हरिष बाहेती लाेकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

Vaccination is needed to prevent caries infection - Dr. Harish Baheti | काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण आवश्यक - डाॅ. हरिष बाहेती 

काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण आवश्यक - डाॅ. हरिष बाहेती 

Next

वाशिम :  जिल्हयात दिवसेंदिवस काेराेना बाधितांच्या संख्येत माेठया प्रमाणात वाढ हाेत असून हा संसर्ग राेखण्यासाठी नागरिकांची खबरदारी व लसीकरण महत्वाचे आहे, याकरिता नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डाॅ. हरिष बाहेती लाेकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

वाढत्या काेराेना संसर्गाबाबत काय सांगाल ?
वाढती काेराेना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. शास्त्र असे सांगतेय की ६० टक्के काेराेना बाधित जाेपर्यंत हाेत नाही ताेपर्यंत काेराेना आटाेक्यात येणे शक्य नाही. किंवा ६० टक्के लसिकरण पूर्ण हाेत नाही ताेपर्यंत दिलासा नाही. त्यामुळे लसिकरण करणे आवश्यक आहे.?

लसिकरणाची गती वाढविण्यासाठी काय अपेक्षित आहे?
प्रशासनाच्यावतिने लसिकरणासाठी ठाेस उपाय याेजना केल्या आहेत. शासनातर्फे आराेग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काही खासगी ठिकाणी सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी जेथे शक्य असेल तेथे लसिकरण करुन घेणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयात माेफत लसिकरण हाेते म्हणून तेथे गर्दी करुन काेराेनाचे वाहक बनू नका. खासगीतही ना नफा ना ताेटा लसीकरण केले जात आहे.

खासगीत लसिकरणाला खूप खर्च येताे का?
बिल्कुलच नाही, अनेक नागरिक शासकीय रुग्णालयात गर्दी हाेत असल्याने खासगी दवाखान्यात लसिकरण करुन घेत आहेत. अनेक डाॅक्टरमंडळी जनसेवा म्हणून केवळ लसीचे पैसे घेऊन लसिकरण करुन देत आहेत. यामागे कमाईचा काेणताच उद्देश त्यांचा नाही. अनेकांना स्टाॅफ व ईतर साहित्य लागतेय त्याचे सुध्दा चार्जेस न घेतल्याच्या सारखे आहेत.

नागरिकांना काय आवाहन कराल
काेराेना संसर्ग हाेऊ नये याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी लसिकरण करा. कुठे का नाही करा पण लसिकरण करुन आपले व आपल्या जिल्हावासियांचे आराेग्य अबािधत ठेवा.

Web Title: Vaccination is needed to prevent caries infection - Dr. Harish Baheti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.