जिल्हा कारागृहातील कैदी बांधवांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:46+5:302021-04-19T04:38:46+5:30
लसीकरण ही बाब अनिवार्य नसून, संबंधितांची मंजुरात घेऊन केल्या जाते. त्यामुळे जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांनी बालरोगतज्ञ डॉ. ...
लसीकरण ही बाब अनिवार्य नसून, संबंधितांची मंजुरात घेऊन केल्या जाते. त्यामुळे जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांनी बालरोगतज्ञ डॉ. हरिष बाहेती, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष नीलेश सोमाणी व डॉ. सुजाता सोमाणी यांना कैद्यांना मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित केले. यावेळी प्रभावी उदाहरणासह लसीकरणाचे महत्त्व मान्यवरांनी विषद केले. त्यामुळे कैद्यांचे मन परिवर्तन होऊन जवळपास १७ जणांनी लसीकरण केले. मात्र, शंका-कुशंकेमुळे तीन कैद्यांनी लस न घेतल्याचा निर्णय न घेतल्याने कारागृह प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली. जर तिघांचे लसीकरण झाले नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील ही भीतीही निर्माण झाली. त्यामुळे पुन्हा जिल्हा कारागृह प्रशासनाने रविवारी (दि.१८) संबंधित कैद्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. हरिष बाहेती, नीलेश सोमाणी व देव इंगोले यांना निमंत्रित केले. त्यांनी कैद्यांना मार्गदर्शन, त्यांची भीती दूर केली. लगेच कैद्यांनी लसीकरण करण्यासाठी होकार दिला. सर्व कैदी बांधवांचे लसीकरण पूर्ण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. एन. राऊत, कॉ. मुरलीधर ठाकरे, मिश्रक रंजित पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ. हरिष बाहेती, नीलेश सोमाणी, देव इंगोले उपस्थित होते.