मालेगाव येथे लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:33+5:302021-05-09T04:42:33+5:30
कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत आहे. एका महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीम प्रभावित ...
कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत आहे. एका महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीम प्रभावित होत आहे. मालेगाव येथे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोद घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी लसीचे डोस शिल्लक नसल्याचे ग्रामीण रुग्णालयात सांगण्यात येत आहे. लस कधी उपलब्ध होतील याची शाश्वती देता येत नाही, असे सांगण्यात आले. तसेच कोविशिल्ड लसीचे डोस असून ते शहरी भागात उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मालेगाव येथे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस केव्हा मिळणार, याची काळजी लागली आहे. कोविशिल्डची दुसरी लससुद्धा काही लोकांना मिळते तर काहींना मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोव्हॅक्सिनचे दुसरे डोस येत नाहीत. काही लोक दररोज येऊन चौकशी करत आहेत. वरिष्ठस्तरावरून आदेश आले नसल्याने ते देता येत नाही, असे ग्रामीण रुग्णालय मालेगावचे डॉ. वाढवे यांनी सांगितले.