वैंदूंची जात पंचायत आदर्श व्यवस्था

By admin | Published: December 13, 2014 12:29 AM2014-12-13T00:29:03+5:302014-12-13T00:29:03+5:30

सलोख्याने घेतल्या जातात निर्णय : उघडयावरचं भरते पंचायत.

Vaidu's caste Panchayat Model System | वैंदूंची जात पंचायत आदर्श व्यवस्था

वैंदूंची जात पंचायत आदर्श व्यवस्था

Next

डॉ.दिवाकर इंगोले /कारंजा (वाशिम)

        जात पंचायत ही संस्था अलिकडच्या काळात कालबाहय़ झालेला आणि वादग्रस्त प्रकार मानला जात असला तरी, हे सर्वच जातपंचायतींसाठी लागू होत नाही. काही जातपचांयतही आजही टिेकून असून, त्यांच्यामार्फत आजही जातीसंदर्भातील निर्णय सलोख्याने घेऊन न्यायनिवाडा करण्यात येतो. अशाच काही जातपंचायंतीपैकी एक म्हणजे भटक्याविमुक्त जातीत मोडणार्‍या आणि तेलगू मातृभाषा असलेल्या वैदू समाजाची जात पंचायत होय. आजच्या काळात जात पंचायत ही सामाजिक संस्था कालबाहय़ ठरत असली तरी, काही समाजात मात्र आजही ती कायम असून, त्या समाजातील जवळपास प्रत्येकच सामाजिक निर्णय जातपंचायतमध्येच घेतले जातात. या समाजात पंचायतीत निर्णय घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर अतिशय अपरिहार्य कारण वगळता प्रत्येक आमंत्रित व्यक्तीला या पंचायतीमध्ये स्वखर्चाने उपस्थित राहावे लागते. पंचायतीत त्यांच्या तेलगू या मातृभाषेमध्ये मान्यवर आपली मते आणि मुद्दे उपस्थित करतात. त्यावर अनुमोदन, सर्मथनही दिले जाते. दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर संबंधित विषय किंवा मुद्यावर सर्वसंमतीनेच निर्णय घेतला जातो. या पंचायतीमध्ये समाजातील वडिलधार्‍या व्यक्तींच्या मताला मोठा मान असतो. यामध्ये एखाद्याने निर्णयाला विरोध केलाच, तर त्याला निराश न करता. विरोधाचे सकारण स्पष्टीकरण देण्याची सूचना करण्यात येते. वैदू ही भटकी जमात आहे. झाडपत्ती, जडीबुटी विकायचे, नाडी परीक्षण क रून आजार ओळखायचे. स्त्रियांनी घरोघर फिरून मणीडोरले, बाळय़ा, बुगडी, बांगड्या आदि वस्तू विकण्याचे काम क रायच्या या समाजाचे हेच या समाजाचे पारंपरिक व्यवसाय होते. वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे, तसेच शहरासह ग्रामीण भागांतही वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे वैदू समाजाचा पारंपरिक जडीबुटी विकण्याचा, नाडी पाहण्याचा व्यवसाय कालबाहय़ होऊन बाळय़ा, बुगड्या, मणीडोरले विकणे हाच व्यवसाय उरला. भटकंती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले. त्यामुळेच हा समाज आजही गावाबाहेर असलेल्या उजाड, मोकळय़ा जागेत पालाची घरे उभारून वास्तव्य राहतात.

Web Title: Vaidu's caste Panchayat Model System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.