लाेकवर्गणीतून कारंजेकरांच्या सेवेत वैकुंठरथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:23+5:302021-01-08T06:10:23+5:30

अंत्यविधीचे कार्य पार पाडताना शहरात असलेले अपुरे वैकुंठरथामुळे शहरवासीयांना अडचणी निर्माण हाेत हाेत्या. कारंजा येथे एक जुना वैकुंठरथ बंदावस्थेत ...

Vaikuntharath in the service of Karanjekar from Lakvargani | लाेकवर्गणीतून कारंजेकरांच्या सेवेत वैकुंठरथ

लाेकवर्गणीतून कारंजेकरांच्या सेवेत वैकुंठरथ

googlenewsNext

अंत्यविधीचे कार्य पार पाडताना शहरात असलेले अपुरे वैकुंठरथामुळे शहरवासीयांना अडचणी निर्माण हाेत हाेत्या. कारंजा येथे एक जुना वैकुंठरथ बंदावस्थेत होता, तर दुसरा वैकुंठरथ कश्यप बंधूंच्या वतीने तयार केल्यावर हा अपुरा पडत होता. शहराची वाढती लोकसंख्या व लोकांच्या समस्या पाहून निधन झालेल्या परिवारातील सदस्यांचा अंतिम संस्कार करताना यावेळी खासगी वाहनाने नेहमी जास्त पैसा व वेळ वाया जायचा. याची जाणीव लक्षात घेता गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था कारंजाच्या वतीने सर्व सदस्यांनी चर्चा करून कारंजातील सामाजिक, राजकीय, पोलीस प्रशासन आदी संस्थेच्या वतीने दानशूर व्यक्तींच्या मदतीने लोकवर्गणीतून कारंजेकरांच्या सेवेत नवीन वैकुंठरथ निर्माण केला. २ जानेवारी राेजी सकाळी ११ वाजता कारंजा येथील बजरंग पेठ येथे श्री संत गाडगेबाबा पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजा अर्पण करून नवीन वर्षाच्या भेटस्वरूप कारंजेकरांना नवीन वैकुंठरथ सेवेत रुजू केला. तसेच याकरिता लागलेल्या मान्यवरांचा गाडगेबाबा विचार मंचच्या वतीने सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले.

Web Title: Vaikuntharath in the service of Karanjekar from Lakvargani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.