माेप आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:38+5:302021-06-16T04:53:38+5:30

भर जहाॅगीर : मोप प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. माेप ...

Variety of staff in the sub-center coming under MAP Health Center | माेप आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा वाणवा

माेप आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा वाणवा

Next

भर जहाॅगीर : मोप प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

माेप प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातर्गंत नऊ उपकेंद्र व सत्ताविस गावांचा समावेश होतो. यातील अनेक गावांतील आरोग्य सेवकांचे पदे रिक्त असल्याने पावसाळ्यातील विविध साथ उद्भवणाऱ्या साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोना महामारीने नुकताच काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. यादरम्यान आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागलेली आहे. आता पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे. अनेक ग्रामपंचायतींची पावसाळ्यापूर्वीची कामे जैसे थे असल्याने गावातील नदी नाल्यामध्ये घाण पाणी साचून साथरोगांचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता आहे. यावेळी आरोग्य यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मोप येथील आरोग्य सेवक, परीचर एक पद रिक्त, मांडवा येथे आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, शेलुखडशे येथे आरोग्य सेवक, लोणी बु.येथे आरोग्यसेवक, भर जहागीर येथे आरोग्य सेवक ही पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.

--------------

कोरोना संसर्ग रुग्ण वाढी दरम्यान आरोग्य यंत्रणेने चांगली आरोग्य सेवा दिली. परंतु हल्ली पावसाळ्याचे दिवस आल्याने साथरोगाची शक्यता वाढल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुबलक आरोग्य कर्मचारी असणे आवश्यक आहेत.

आशिष सिंह,

वैद्यकीय अधिकारी मोप

मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रिक्त आरोग्य कर्मचारी पदे भरण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार आहे. कारण हा नागरिकांच्या आरोग्य संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे.

शारदा आढाव, पंचायत समिती सदस्य, भर जहागीर

Web Title: Variety of staff in the sub-center coming under MAP Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.