आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:42 AM2021-08-15T04:42:04+5:302021-08-15T04:42:04+5:30
..................... चार तालुक्यांचा अहवाल निरंक वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. विशेष म्हणजे शनिवारी आरोग्य विभागाकडून ...
.....................
चार तालुक्यांचा अहवाल निरंक
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. विशेष म्हणजे शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. चारही तालुक्यांचा अहवाल आज निरंक राहिला.
.............
खाद्यतेलाचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलासह अन्य स्वरूपातील किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे मासिक बजेट बिघडल्याचा सूर उमटत आहे. दरम्यान, खाद्यतेलाचे दर कमी करावे, अशी मागणी होत आहे.
.....................
वायू प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : रिठदमार्गे वाशिम-रिसोड मार्गावरून धावणारी प्रवासी वाहने, ऑटोंपैकी अनेक वाहने भंगार झालेली आहेत. या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे वायू प्रदूषण होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
...................
वाशिम येथे सापाला जीवदान
वाशिम : येथील सर्पमित्र युवकांनी शनिवार, १४ ऑगस्टला सिव्हील लाईन भागात साप आढळल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी हजर होऊन तासभराच्या प्रयत्नांनंतर सापाला ताब्यात घेऊन एकबुर्जी प्रकल्पानजीक सुरक्षितस्थळी सोडून दिले.
....................
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
वाशिम : मालेगाव ते अकोला या प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत असून, संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.